मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या महिलेचा पुण्यात ससून रुग्णालयात अखेर मृत्यू

618 0

मंत्रालयासमोर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संगीता डवरे या महिलेचे आज पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना झालेल्या अपघातानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. या डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी तक्रार संगीता यांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे कुणी लक्ष दिले नाही. सरकार दरबारी खेटे घालूनही त्यांच्या मागणीला दाद मिळत नसल्याने निराश होऊन संगीता डवरे 27 मार्च रोजी या डॉक्टरवर कारवाईची मागणी घेऊन मंत्रालयात पोहचल्या होत्या. मंत्रालयासमोर विषप्राशन करून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या ठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचे आज मंगळवारी निधन झाले.

Share This News
error: Content is protected !!