पतिपत्नीच्या नात्याला काळिमा ! पैशासाठी पत्नीला केले मित्रांच्या हवाली

947 0

पैशासाठी पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उघडकीस आली आहे. या प्रकरणी २५ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी पतीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर 2020 पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या पतीला पैशाची आवश्यकता होती. त्यामुळे पैशाची गरज भागवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला मारहाण करत उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने आपल्याच दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेऊन पत्नीला त्या मित्रांच्या हवाली केले. इच्छा नसतानाही मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास तिला भाग पाडले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडिता रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवून तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!