मुख्यमंत्री कार्यालयातून ससून रुग्णालयात फोन…. दिला हा आदेश… काय आहे प्रकरण ?

396 0

कोणत्याही सरकारी कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर जशी अधिकाऱ्यांची धावपळ उडते तशीच सोमवारी संध्याकाळी ससून रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उडाली. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना लॅण्डलाईनवर फोन आला आणि पलीकडून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने चक्क आदेश दिला.

सोमवारी संध्याकाळी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना लॅण्डलाईनवर फोन आला. फोन करणाऱ्याने आपण मुख्यमंत्र्यांचे पीए असल्याचे सांगितले. फोन करणारा तब्बल पाच मिनिटे बोलत होता. त्याने सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्या व्यक्तीने मग ससूनच्या आवारातील दोन कँटीन तातडीने बंद करण्याची आदेशवजा सूचना दिली.

अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यापर्यंत ही बाब गेल्यानंतर त्यांना या प्रकाराचा संशय आला. त्यांनी खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला त्यानंतर हा कॉल फेक असल्याचा उलगडा झाला. तत्पूर्वी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी संध्याकाळी कँटीन समितीची बैठक घेतली होती. चार कँटीनच्या निविदेची मुदत संपल्याने ती बंद करणार असल्याबाबत त्यात चर्चा झाली होती. त्यातूनच कुणीतरी हा फेक कॉल केला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नसून अशा प्रकरणात वेळ वाया न घालवता त्यापेक्षा रुग्णांच्या शस्त्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत, असे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले.

 

Share This News
error: Content is protected !!