suicide

इसमाची आत्महत्या ! सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांच्या नावामुळे खळबळ

1250 0

वर्धा शहरात एका ४० इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या इसमाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संदीप विनोद चापडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. संदीपच्या मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिट्ठीमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहिण्यात आलेली असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या धमकीमुळे मी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. या घटनेबाबत ठाणेदार महेश चव्हाण म्हणाले की मृताच्या वडिलांची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर कारवाई केली जाईल.

Share This News
error: Content is protected !!