आत्महत्या करण्यासाठी ती पुलावर चढली… पुण्यात वाहतूक पोलिसांनी वाचवले मुलीचे प्राण

3911 0

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील आरटीओ चौकात एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पुलाच्या कठड्यावर चढली. मात्र जवळच वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांचे लक्ष गेल्याने तिचे प्राण वाचले.

आरटीओ चौकात एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पुलाच्या कठड्यावर चढलेली असताना जवळच वाहतूक नियमन करणारे पोलीस कर्मचारी कुचेकर आणि चव्हाण यांचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तातडीने एका मोटारसायकलवरील दोन महिलांची मदत घेऊन त्यांना तिच्याजवळ पाठवले. त्यांनी तिची विचारपूस करून तिला धीर दिला.

तिला शांत करून दामिनी पथकातील मार्शलला बोलावून मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले.

Share This News
error: Content is protected !!