अनेकांना उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका असतो. शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल हा एक वाईट पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि त्याची पातळी सतत वाढत राहिल्यास हृदयविकार, मज्जातंतू संबंधित रोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी ज्यूस घेणे फायदेशीर ठरते.
टोमॅटोचा ज्युस
उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये टोमॅटोचा ज्युस पिणे फायदेशीर ठरू शकते. एका अभ्यासानुसार, दररोज 400 मिली टोमॅटोचा ज्युस प्यायल्याने एकूण कोलेस्ट्रॉल 5.9% आणि LDL कोलेस्ट्रॉल 12.9% कमी होऊ शकते. खरं तर, टोमॅटो लिपोप्रोटीन शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि ट्रायग्लिसराइड आणि लिपिड रेणू काढून टाकण्यास मदत करू शकते.
डाळिंब आणि आवळा ज्युस
उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये डाळिंब आणि आवळ्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. डाळिंब आणि आवळा हे दोन्ही अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात. डाळिंबात उच्च अँटिऑक्सिडंट क्रियाकलाप असलेले कॅटेचिन असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय आवळ्यामधील व्हिटॅमिन सी रक्त पेशींना डिटॉक्स करू शकते.
ओट्सपासून बनवलेला ज्युस
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ओट्स खूप प्रभावी आहेत. त्यात बीटा-ग्लुकन्स नावाचे पदार्थ असतात जे पित्त क्षारांसह एकत्रित होऊन आतड्यांमध्ये जेलसारखा थर तयार करतात ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ओट्समध्ये चिया सीड्स आणि लिंबू मिसळून ज्यूस बनवा आणि त्याचे सेवन करा.