थरारक ! माथेफिरूने चालत्या रेल्वेत सहप्रवाशांवर पेट्रोल ओतून लावली आग, तिघांचा मृत्यू

788 0

एका माथेफिरूने चालत्या रेल्वेत सह प्रवाशांवर पेट्रोल टाकून आग लावली. या घटनेत एक महिला, दोन वर्षाची एक मुलगी आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. ही थरारक घटना अलाप्पुझा ते कन्नूर जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या पहिल्या बोगीत रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एलाथुर रेल्वे स्टेशनजवळ घडली.

मृत महिलेचे नाव रहमथ असून लहान मुलीचे नाव नौफल असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रवाशाचं काही सह प्रवाशांबरोबर भांडण झालं. यामुळे संतापलेल्या आरोपीने सह प्रवाशांवर पेट्रोल टाकत आग लावली. त्यामुळे बोगीत अचानक आग लागली. आग भडकत गेली, त्यामुळे घाबरलेल्या रहमथने दोन वर्षांचया नौफलस चालत्या रेल्वेतून उडी मारली. त्यांच्याशिवाय आणखी एका प्रवाशाने चालत्या रेल्वेतून उडी मारली. रेल्वे वेगात असल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

आगीत बोगीतील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आग लावल्यानंतर आरोपी रेल्वेतून फरार झाला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. घटनास्थळी केरळ पोलीस आणि फॉरेन्सिक पथक दाखल होत तपास सुरु केला.

थांबवली प्रवाशांनी रेल्वे थांबवली

रेल्वेला आग लागलेली पाहताच दुसऱ्या बोगीतील प्रवाशांनी साखळी खेचत रेल्वे थांबवली. रेल्वे कन्नूर स्थानकावर आली असता एक महिला आणि एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. बोगीत बेपत्ता महिलेचा मोबाईल आणि लहान मुलीचे बूट आढळले. मिळालेल्या सामानाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असता इलाथुर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकवर महिला आणि लहान मुलीचा मृतदेह आढळला. याशिवाय आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

Share This News
error: Content is protected !!