मुंबईत शुक्रवारी रात्री वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. उद्योग जगतातील बड्या व्यक्तींपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारण आणि क्रीडाविश्वातील अनेक दिग्गज यावेळी एकत्र दिसले. या कार्यक्रमात राज्याचे दोन माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्नीसह उपस्थिती दर्शवली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव आदित्य ठाकरे तसेच देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देवेंद्र फडणवीस नेहमीप्रमाणे लाईट ब्लू रंगाच्या शर्टवर मोदी कोट व ब्लॅक पॅंटमध्ये दिसून आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अबोली रंगाची सॅटिन साडी परिधान केली होती. या साडीवर पिंक आणि ग्रीन रंगात फुलांचे सुंदर डिजाइन होते. अमृता फडणवीस यांनी साडीवर एकदम मॅचिंग असा थ्री फोर्थ स्लीव्हजचा ब्लाऊज परिधान केला होता.
रश्मी ठाकरे यांनी गोल्डन-सिल्वर रंगाचीच अगदी हलकीशी फुलाफुलांची डिझाईन असलेली फिरत्या रंगाची गोल्डन कांजीवरम साडी परिधान केली होती. कपाळावर लाल टिकली, मरून बांगड्या, टेम्पल ज्वेलरी आणि कर्णफुले घातलेल्या रश्मी ठाकरे बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये देखील उठून दिसत होत्या. उद्धव ठाकरेंनी सुद्धा गोल्डन रंगाचा कुर्ता पायजमा सेट परिधान केला होता. पायात ब्लॅक कलरचे मोजडी स्टाईल शूज दिसत होते. आदित्य ठाकरे व्हाईट शर्टवर ब्लॅक हाफ स्लीव्हजचा कोट आणि पायात ब्लॅक शुज घालून एखाद्या हिरोसारखे दिसत होते.
या कार्यक्रमाला देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्तिमत्त्वांनी इथे उपस्थिती लावली होती. याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रियांकादेखील पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा- जोनससोबत मुंबईत पोहोचली. कार्यक्रमात पोहोचल्यानंतर सेलिब्रिटी एकमेकांना भेटले आणि प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनीही एकमेकींची भेट घेतली.
मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) च्या संचालक ईशा अंबानी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.