Breaking !संजय राऊत यांना धमकी, महत्वाची अपडेट ! एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, त्याचे नाव….

928 0

शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलसांनी पुणे पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई करत एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. लवकरच सदर प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

राहुल तळेकर (अंदाजे वय 23) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. पुण्यातील गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून ताब्यात घेतले. संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज आल्यानंतर या मागे नेमकं कोण आहे, हे शोधून काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. मुंबईतील गुन्हे शाखेच्या मदतीने पुणे पोलिसांनी सापळा रचून तळेकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

एकूणच या धमकीमागील सूत्रधार कोण याचा तपास लागण्याची शक्यता आहे.

 

Share This News
error: Content is protected !!