सध्या भाजप नेत्यांकडे खंडणी मागितल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता पुणे भाजपचे पदाधिकारी गणेश बिडकर यांना तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन फोन कॉल करून शंभर कोटींची खंडणी मागितल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी कर्नाटक मधून जयेश पुजारी याला अटक केली. त्यानंतर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मोबाइल हॅक करून पुण्यातील एका बिल्डरकडे 3 कोटी रूपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. आता खंडणीची तिसरे प्रकरण समोर आले असून भाजप नेते गणेश बिडकर यांना व्हॉट्सअॅप कॉल करून तब्बल 25 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
30 मार्च 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजता गणेश बिडकर हे श्रीराम जयंतीच्या मिरवणुकीमध्ये असताना त्यांना एका नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉल करणाऱ्याने बिडकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तो म्हणाला, तुला राजकिय मस्ती आली आहे, तेरे पास बहोत पैसे हो गया है, अब थोडा खर्चा भी कर, नाही तर तुझी बदनामी करून तेरा पुलिटीकल करिअर बरबाद करूंगा, तु चुपचाप 25 लाख रूपये दे (Ransom Case), तुने अगर पैसे नही दिये तो तु देख कैसे खेल शुरू होनेवाला है. असे बोलुन त्याने बिडकर यांना शिवीगाळ केली” यासंदर्भात गणेश बिडकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी संबंधित व्हॉट्सअॅप नंबर धारकाविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील सायबर पोलिस करीत आहेत.