पोलिसांनी डीजे लावण्यापासून रोखताच दोन तरुणांनी उचलले टोकाचे पाऊल

2437 0

काल गुरुवारी सर्वत्र रामनवमीचा सण मोठ्या भक्तिभावात साजरा झाला. या उत्सवादरम्यान परभणी जिल्ह्यातील मानवत शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पोलिसांनी डीजे लावण्यापासून रोखल्यामुळे दोन युवकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही युवक सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

शुभम आप्पासाहेब दहे (वय २३), शिवप्रसाद बिडवे (वय २२) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकांची नावे आहेत. पोलिसांसोबत झालेल्या वादातून युवकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रामनवमी निमित्त मानवत येथे गुरुवारी मार्चला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार होता. परंतु डीजेला परवानगी नाही असे सांगून पोलिस प्रशासनाने सिंगर बँड पथकास वाजवण्यास प्रतिबंध केला. यामुळे जमलेल्या युवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. त्यातून या दोन युवकांनी विषारी औषध प्रश्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी दोघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु एका युवकाची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे.

‘तू पॉयझन घे आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही’

रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये डीजे वाजवण्यावरून पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक स्वामी यांनी सांगितले की, ‘तू पॉयझन घे आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही. सगळं डिपार्टमेंट माझ्या हातात आहे. माझं कोणी काही वाकड करू शकत नाही’, असे शब्द पोलीस निरीक्षकांनी वापरले असा आरोप शुभम दहे या युवकाची आई विजयमाला दहे यांनी केले आहेत. माझ्या मुलाच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर मी पोलीस स्टेशन समोरच आत्महत्या करेन असा इशारा त्यांनी दिला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!