त्रिपुरा विधानसभेत भाजप आमदार पॉर्न व्हिडिओ बघण्यात दंग, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

943 0

त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणूका जिंकत भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु असताना सभागृहात एका भाजप आमदाराला पॉर्न व्हिडिओ बघताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे.

मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाज सुरु असताना मंत्री महोदय तंबाखूची देवाणघेवाण करतानाचा एका व्हिडिओची चर्चा झाली होती. इथपर्यंत ठीक आहे. पण ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, त्याच पवित्र ठिकाणी कुणी अश्लील व्हिडिओचा आनंद घेत असेल तर त्याला काय म्हणायचं ?

असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे त्रिपुरा विधानसभेतील कामकाजाचा. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार विधानसभेच्या अधिवेशन सत्रादरम्यान सभागृहात बसून मोबाईलवर पॉर्न पाहाताना दिसत आहेत. हे आमदार मोबाईलवर व्हिडीओ पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या आमदाराचे नाव आहे जादब लाल नाथ. ते बागबासा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हा व्हिडिओ आज ३० मार्चचा असल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभेच्या कामकाजादरम्यान सभागृहात पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचा आरोप जादब लाल नाथ यांच्यावर केला जात आहे. फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Share This News
error: Content is protected !!