मोठी बातमी : मलकापुरात काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात सव्वा दोन वर्ष वीज चोरी; 10 लाख 47 हजाराचा दंड वसूल

512 0

मलकापूर : मलकापुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस नेत्याच्या रुग्णालयात आणि घरात तब्बल सव्वा दोन वर्ष वीज चोरी सुरू होती. या प्रकरणी आता या काँग्रेस नेत्याकडून बुलढाणा विद्युत वितरणच्या भरारी पथकाकडून दहा लाख 47 हजार 922 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, डॉक्टर अरविंद कोलते असे या काँग्रेसने त्याचं नाव आहे . या काँग्रेस नेत्याच्या घरात आणि रुग्णालयात विजेची चोरी करण्यात आली होती. विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून थोडी थोडकी नाही तर तब्बल सव्वा दोन वर्ष ही वीज चोरी सुरू होते. बुलढाणा विद्युत वितरणच्या पथकाने या काँग्रेसने त्याच्या रुग्णालय आणि घरात असलेल्या विद्युत मीटरची तपासणी केली असता विद्युत मीटर मध्ये छेडछाड केल्याचं उघडकीस आलं.

त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या काँग्रेस नेत्याला १० लाख 47 हजार 922 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सव्वा दोन वर्षात तब्बल 600978 युनिटची चोरी केल्याचं या भरारी पथकाच्या निदर्शनास आल आहे. या कारवाई न मलकापूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!