पुणे -मुंबई महामार्गावर तळेगावजवळ पिकअप-ट्रकचा अपघात, महामार्गावर केळीच केळी

309 0

तळेगाव- जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळ पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातानंतर महामार्गावर केळीच केळी विखुरली गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात आज सकाळी झाला. पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणारा पिकअप टेम्पो (एम एच ४५ ए एफ ६२३३) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून जाणाऱ्या ट्रक वर धडकला. या अपघातानंतर महामार्गावर केळ्यांचा अक्षरशः खच पडला. या केळ्यांवरून वाहने घसरण्याची भीती असल्याने दुसरी कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये. यासाठी तळेगांव दाभाडे पोलिसांनी प्रसंगावधान राखत आय आर बी देवदूत रेस्क्यूला पाचारण केले. अपघाताचे ठिकाण स्वच्छ करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Share This News
error: Content is protected !!