बियरप्रेमींसाठी खास बातमी ! घराच्या घरी बनावट येणार बियर, जर्मनीमध्ये तयार झाली खास पावडर, फक्त २ चमचे आणि तयार…

1468 0

बियरच्या शौकीनांना उन्हाळा सुरु झाला कि तल्लफ लागते ती बियरची… तशी बियर तुम्हाला सहज उपलब्ध होते. पण जर तुम्हाला सांगितले कि, आता बियर देखील तुम्हाला घराच्या घरी बनवता येऊ शकते तर ? हो वाचताय ते बरोबर आहे. जर्मनीतील एका कंपनीने आता बिअर पावडर तयार केली आहे.

या बिअर पावडरचा वापर करुन तुम्ही सहज घरच्या घरी अवघ्या दोन मिनिटांमध्ये थंडगार बिअर तयार करु शकता. हे ऐकून खोटं वाटत असले तरी हे खरं आहे. जर्मनीतील एका कंपनीने ही बिअर पावडर बनवली आहे. अशा प्रकारचा हा पहिला शोध असून ही जगातील पहिली बिअर पावडर आहे. याआधी कधीही पावडर स्वरूपात बिअर बनवली गेली नव्हती.

तुम्ही फक्त दोन चमचे पावडर थंड पाण्यात मिसळा आणि तुमची थंडगार बिअर तयार आहे. यासोबतच हे पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे, कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही.

पूर्व जर्मनीमधील नोएटसेल ब्रुअरी कंपनीने ही बिअर पावडर तयार केली आहे. ही बिअर पावडर बनवणाऱ्या नोएटसेल ब्रुअरीने सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस ही बिअर पावडर बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!