धक्कादायक : खेळताना बॉल काढण्यासाठी डबक्यात वाकला, तोल जाऊन पडल्याने बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

1087 0

कल्याण : कल्याण पूर्वेकडील कैलास नगर परिसरात राहणारा बारा वर्षीय रियाज शेख हा मुलगा शाळा सुटल्यानंतर घराजवळच असलेल्या एका डबक्यात पडलेला बॉल घेण्यासाठी वाकला. त्याचा पाय घसरल्याने तो खड्ड्यात पडला. स्थानिक नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गाळात रुतला असल्याने त्याला वाचवता आले नाही.

यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बोटीच्या मदतीने मुलाचा शोध सुरू केला. इमारतीच्या बांधकामासाठी हा खड्डा खानाला होता. यामध्ये पाणी साचले होते. स्थानिक नागरिक यांनी कर्मचाऱ्यांची मदत केली. या खड्ड्यात उडी मारून गालात रुतलेल्या रियाजचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने कुटुंबियांनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!