अदानींवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला ? भाजप भ्रष्ट अदानींना का वाचवत आहे ? मोदी आणि अदानींचे संबंध जगासमोर आणणार; राहुल गांधींचा घणाघात

847 0

नवी दिल्ली : अदानी यांच्या शेल कंपनीमधील 20 हजार कोटी कोणाचे आहेत? माझ्या या साध्या प्रश्नाचे उत्तर भाजप का देत नाही? असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. 2019 मधील वक्तव्यानंतर खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा हल्ला चढवला आहे. मी मोदींना प्रश्न विचारत नाही. तर अदानींवरुन प्रश्न विचारत आहे. तुम्ही पीएम मोदींना वाचवा, मात्र, भ्रष्ट अदानींना भाजप कशासाठी वाचवत आहे ? असा सवाल उपस्थित करून तुम्हीच अदानी आहात असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

जनतेला माहित आहे कि, अदानी भ्रष्ट आहे, मग पंतप्रधान मोदी अदानींना का वाचवत आहेत ? अदानींवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला म्हटले जात आहे. देश म्हणजे अदानी आणि अदानी म्हणजे देश आहे का ? असा संताप देखील यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!