शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना नारळ; खासदार गजानन कीर्तिकर यांची नव्याने नियुक्ती, वाचा सविस्तर

1007 0

मुंबई : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्त्वाच्या पदावरून ठाकरे गटाच्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती शिवसेनेच्या संसदीय नेते पदी करण्यात आली आहे. तर राज्यसभा खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

याविषयी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र लिहून ही माहिती दिली आहे. दरम्यान नियुक्तीनंतर कीर्तीकर यांनी ट्विट करून शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी संसदेतील पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवून त्या जागी स्वर्गीय आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटासोबत असलेले कीर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता ही मोठे जबाबदारी शिंदे गटाने कीर्तीकर यांच्यावर सोपवली आहे.

Share This News
error: Content is protected !!