प्रसिद्ध एकपात्री कलाकार वंदन नगरकर यांचे निधन

505 0

पुणे : प्रसिद्ध एकपात्री कलाकार आणि व्यक्तिमत्व विकास तज्ञ वंदन नगरकर यांचे मंगळवारी निधन झाले फुफुसांच्या कर्करोगाने ते त्रस्त होते चेन्नई येथील रुग्णालयात त्यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती त्यानंतर ते पुण्यात आले होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात मंगळवारी त्यांचं निधन झालं. 

त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होते आहे.  रात्री उशिरा त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर वैजयंती आणि मुलगी बिनिशा या आहेत तर विनोदी अभिनेते नाटककार आणि लेखक राम नगरकर यांचे ते सुपुत्र होते

कला जगतामध्ये वंदन नगरकर यांचे मोठे योगदान आहे त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत दोन हजार कार्यशाळा घेतले आहेत भाषणाचे प्रभावी तंत्र भरारी यशाची टर्निंग पॉईंट पालकांचे चुकते कुठे प्रभावी इंटरटेनिक्स आणि इंग्रजीतील स्पीक वीक कॉन्फिडन्स अशा सहा पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे तर अनेक प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर लेख देखील प्रसिद्ध झाले आहेत

Share This News
error: Content is protected !!