भारतामध्ये देखील APPLE प्रेमी खूप आहेत. आयुष्यात एकदा तरी APPLE चा फोन, लॅपटॉप अशी उपकरणे वापरावीत असा अगदी प्रत्येकालाच वाटत असतं. तर मग अशा एप्पल प्रमींसाठी एक खास बातमी आहे. भारतातील बाजारपेठेमध्ये APPLE कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे येत्या महिन्यातच भारतातील पहिलं स्टोअर हे मुंबईमध्ये उघडले जाणार आहे.
विशेष म्हणजे न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूर सारखे हे एप्पल चे स्टोर उभारले जाणार असून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ वर्ल्ड मॉल मध्ये हे उभारण्यात येणार आहे. तब्बल 22 हजार स्क्वेअर फुटवर हे बांधकाम केले जाणार असून भारतातील ॲपलचे हे पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर असणार आहे.
त्याचबरोबर एप्पलच भारतातील दुसरे फ्लेक्स स्टोअर हे राजधानी दिल्लीमध्ये उभारले जाणार आहे हे स्टोअर सिटीबॉक मॉल या ठिकाणी उभारले जाणार असून दहा हजार ते बारा हजार स्क्वेअर फुट मध्ये हे उभारले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे या दुसऱ्या स्टोअरचे लॉन्चिंग हे एप्रिल ते जून या महिन्या दरम्यान होणार असल्याचा समजले
फॉक्सकॉन कंपनीसह Wistron Corp आणि Pegatron Corp सारख्या कंपन्या देखील भारतात Apple ची उत्पादने तयार करत आहेत. फॉक्सकॉनच्या नवीन प्लांटमधील उत्पादन हे २०२४ च्या अखेरीस सुरु होऊ शकते. यासाठी कंपनी भारतात इअरफोन्स तयार करण्यासाठी भारतामध्ये कारखाना तयात करण्याची योजना तयार करत आहे.