ऐकावं ते नवलच ! स्वतःच्याच लग्नात यायला विसरला नवरदेव, जेव्हा लक्षात आलं तेव्हा वधुने थेट…

524 0

बिहार : बिहारमधून पुन्हा एकदा एक विचित्र घटना समोर आली आहे. तर झालं असं की बिहारमधील भागलपूर मधील सुलतानगंज गावातील एका तरुणाचा विवाह ठरला होता. पण नेमक ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी तो आपलं लग्न आहे हेच विसरून गेला. आता लग्नाचा वाढदिवस विसरणं एक वेळेस आपण मान्य करू शकतो. पण थेट लग्नाचा दिवस विसरला हे थोडं अजबचं घडलं आहे.

तर झालं असं की, लग्न उद्यावर असल्याकारणाने आनंद साजरा करण्यासाठी नवरदेवाने त्याच्या मित्रांसोबत आदल्या रात्री भरपूर मद्यपान केलं. आणि त्यानंतर लग्नाला येणं पूर्ण विसरुनच गेला. तो एवढा दारूच्या नशेत बुडाला होता की, स्वतःच्याच लग्नाला उपस्थित राहणं विसरून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा लग्नाच्या ठिकाणी वधू आणि तिच्या कुटुंबीयांना भेटायला गेला. पण वधूने लग्नाला थेट नकारच दिला. कारण योग्यच होतं आपल्या जबाबदाऱ्या न समजणाऱ्या तरुणासोबत आयुष्य घालवता येणार नाही असा तिने निर्णय घेतला. ज्यात तिच्या घरच्यांनी देखील तिला साथ दिली.

एवढेच नाही तर लग्नाच्या आयोजनासाठी केला गेलेला खर्च नवरदेवाच्या कुटुंबीयांनी द्यावा यासाठी नवरदेवाच्या कुटुंबातील काही सदस्यांना वधू कुटुंबांवर बंदी देखील बनवून ठेवलं होतं. त्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि अखेर परिस्थिती नियंत्रणात आली. पण या नवरदेवाच्या मद्यपानामुळे त्याचं लग्न मात्र मोडल आहे.

Share This News
error: Content is protected !!