बिहारमधील रेल्वे स्थानकावर टीव्ही स्क्रीनवर सुरू झाला ‘तसला व्हिडिओ’; प्रवाशांची उडाली भांबेरी

783 0

बिहार : बिहारच्या एका रेल्वे स्थानकावरून एक विक्षिप्त घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील पाटणा रेल्वे स्थानकावर रेल्वे बाबतच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात. या सूचना चालू असतानाच अचानक भर रेल्वे स्थानकावर सकाळी दहाच्या सुमारास टीव्ही स्क्रीनवर पॉर्न मूव्ही सुरू झाली. ही व्हिडिओ क्लिप तब्बल तीन मिनिटं सुरू होती. ही व्हिडिओ क्लिप सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

दरम्यान जाहिरात बघून काही प्रवाशांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे संरक्षण दल यांच्याकडे तक्रार केली. परंतु रेल्वे पोलिसांनी कारवाई करण्यास उशीर केल्याने रेल्वे संरक्षण दलाने थेट रेल्वे स्थानकावर टीव्ही स्क्रीनवर जाहिराती दाखवण्यासाठी ज्या एजन्सीला कंत्राट दिले आहे. त्या एजन्सीवरच कारवाई केली आहे. या एजन्सीला रेल्वेने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले असून त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!