#HEALTH WEALTH : उन्हाळ्यात फिट अँड फाइन राहायचे असेल तर आज ‘या’ खाद्यपदार्थांपासून दूर राहा

371 0

मार्च महिन्यापासून उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. अशावेळी हवामानातील बदलाबरोबरच तुम्ही आपल्या आहारातही योग्य ते बदल करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकाल. उन्हाळ्याच्या काळात जेवणाची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्यात थोडासा निष्काळजीपणा केल्यास या ऋतूत उलट्या, अतिसार, डोकेदुखी, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

उन्हाळी आहार : मार्च महिन्यापासून उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. अशावेळी हवामानातील बदलाबरोबरच तुम्ही आपल्या आहारातही योग्य ते बदल करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकाल. उन्हाळ्याच्या काळात जेवणाची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्यात थोडासा निष्काळजीपणा केल्यास या ऋतूत उलट्या, अतिसार, डोकेदुखी, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

तेलकट आणि जंक फूड

ज्यादा से ज्यादा पानी पीएं: पानी हर तरह की बीमारी के खिलाफ रामबाण का ...

उन्हाळ्याच्या ऋतूत स्वत:ला निरोगी ठेवायचं असेल तर तेलकट आणि जंक फूडपासून दूर राहा. खरं तर जास्त तेलकट आणि जंक फूड खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल, फॅट इत्यादींची पातळी वाढते. यामुळे तुमचे पोट तर बिघडू शकतेच, पण फूड पॉयझनिंगचा धोकाही वाढतो.

चहा आणि कॉफी

esakal | चहा आणि कॉफी पिल्याने मिळतात हे फायदे अन्...

दिवसातून चार-पाच कप चहा किंवा कॉफी पिण्याची अनेकांना सवय असते. विशेषत: ऑफिसमध्ये काम करताना लोक चहा-कॉफी जास्त पितात. पण उन्हाळ्याच्या ऋतूत याचे अतिसेवन केल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. तसेच कॅफिन आणि साखरेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

मांस- मासे आणि वाइन

मांस आणि सॉसेज उत्पादनातील दूषित घटकांची तपासणी

उन्हाळ्याच्या हंगामात मांस आणि माशांचे अतिसेवन देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर ते पचवणं अवघड असतं. अशावेळी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही अनेक समस्यांना बळी पडू शकता. याशिवाय उन्हाळ्यात अल्कोहोलचे सेवन टाळा, कारण यामुळे डिहायड्रेशनदेखील होऊ शकते.

आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक्स

इस गर्मी कोल्ड ड्रिंक्स पीने से पहले पढ़ लें यह खबर, वरना हो सकते हैं ...

उन्हाळ्यात शरीराची शीतलता राखण्यासाठी बहुतेक लोक आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करतात. परंतु कार्बोनेटेड ड्रिंक्सचे सेवन करणे देखील आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर, हे आपल्या हृदयाचे नुकसान करू शकते.

लेखात नमूद केलेले सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांना वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!