क्राईमठळक बातम्याराजकारण

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानियाला गुजरात मधून अटक; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या बुकी अनिल जय सिंघानियाला पोलिसांनी अखेर गजाआड केलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जय सिंघानिया याला अटक केली असून त्याला गुजरात मधून ताब्यात घेतल आहे.

त्यामुळे आता या प्रकरणातील मोठे खुलासे होणार हे निश्चित आहे. जय सिंघानिया याची मुलगी अनिक्षा हिला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता अनिल जयसिंगानिया याला देखील पकडल्यामुळे या प्रकरणावर आता धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.