पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 व्हायरसचा पहिला मृत्यू ! घाबरू नका पण काळजी घ्या !

1004 0

Edited By : बागेश्री पारनेकर : पिंपरी चिंचवड शहरात H3 N2 व्हायरसचा पहिला मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये एका 73 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीला दमा आणि हृदय विकारासारखे काही गंभीर आजार देखील होते अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात सध्या H3 N2 वायरसग्रस्त चार रुग्ण असून, त्यांच्यावर ते राहत असलेल्या घरीच उपचार घेत असल्याची माहिती देखील पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या H3 N2 वायरची साथ ही आटोक्यात असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ज्या लोकांना सर्दी, खोकला आणि ताप सारखी लक्षण आहेत. अशा रुग्णांनी महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे….. अस आवाहन देखील महापालिकेच्या आरोग्य विभागाने केल आहे.

Share This News
error: Content is protected !!