रद्दी विक्रीतून केंद्र सरकारनं केली 63 कोटी रुपयांची कमाई !

486 0

Edited By : रश्मी खेडीकर : मोदी सरकारने वेगळ्या प्रकारचे स्वच्छता अभियान राबवले असून यामधून सरकारला तब्बल ६३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.  मोदी सरकारच्या स्वच्छता मोहिमेची माहिती सगळ्यांना आहेच. पण मोदी सरकारनं एक वेगळ्या प्रकारची स्वच्छचा मोहीम राबवली. ज्यामध्ये जवळपास 6,154 कार्यालयांची स्वच्छता करून त्यात अनेक दिवसांपासून पडून असलेली रद्दी आणि भंगार साहित्याची विक्री विक्री केली.

या विक्रीतून केंद्राला तब्बल 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या विक्रीमुळे आणखी एक फायदा झाला तो म्हणजे या साहित्यामुळे व्यापलेली 12.01 लाख चौरस फूट जागाही मोकळी झालीय. आता या जागेचा उपयोग उपाहार गृह, ग्रंथालये, परिषद, बैठकांसाठी सभागृह, निरामय केंद्रे आणि पार्किंग अशा विविध कारणांसाठी करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्रालये, विभागांमध्ये आणि त्यांच्या संलग्न कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवर स्वच्छतेचे भान यावे यासाठी केंद्र सरकारने 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पहिली विशेष स्वच्छता मोहीम राबविली आणि सरकारला ६२ कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला.

Share This News
error: Content is protected !!