Beed:

#PIMPRI : अपहरणाच्या तक्रारीनंतर चिंचवड पोलिसांनी कुख्यात बाळा वाघेरेच्या राहत्या घरातुन आवळल्या मुस्क्या

2399 0

पिंपरी चिंचवड : चिंचवड पोलिसांनी कुख्यात बाळा वाघेरे याला राहत्या घरातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यापाऱ्याने दिलेल्या अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कुख्यात बाळा वाघेरे त्याचा साथीदार राहुल उणेचा आणि हरीश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर बाळा वाघेरेला अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी व्यापारी आणि हरीश चौधरी या दोघांमध्ये पैशांची देवाण-घेवाण झाली होती. फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सगळी रक्कम परत केली होती. परंतु त्यानंतर देखील सातत्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. आरोपींनी फिर्यादी यांचे पैशासाठी अपहरण केले आणि बाळा वाघेरे याच्या घरी नेलं होतं. त्यांच्याकडे खंडणी देखील मागण्यात आली तर नकार दिल्याने त्यांना मारहाण देखील केल्याची माहिती फिर्यादी यांनी दिली आहे. या तक्रारीनंतरच पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन बाळा वाघेरे याला राहत्या घरातून ताब्यात घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!