पुणे : आजकाल पुणे शहरात कधी काय होईल काही सांगताच येत नाही. आज पहाटे पुण्यामध्ये कोंडवा भागात चार दुचाकी एक चार चाकी आणि एक रिक्षा या जळून खाक झाल्या. आता याआधी तुम्ही असे अनेक किस्से ऐकले असतील की काही विकृत लोकांनी गाड्या जाळल्या किंवा फोडल्या… पण आता या गाड्या ज्या व्यक्तीने जाळलया आहेत त्या व्यक्तींचं कारणच तितकं विकृत आहे.
या व्यक्तीने या गाड्या जाळल्या आहेत कारण त्याची बायको नांदायला येत नव्हती. तर झालं असं की, या व्यक्तीच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. पण काहीच काम धंदा करत नाही म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला पण आपल्या पत्नीने आपल्याच सोबत राहावं म्हणून चिडलेल्या या टेरेन्स डॉमिनिक जॉन नावाच्या व्यक्तीने थेट पत्नीच्या दुचाकीसह तीन दुचाकी एक चार चाकी आणि रिक्षा थेट पेट्रोल टाकून जाळून टाकली
या व्यक्तीला राग इतका अनावर झाला की त्याने केवळ आपल्या पत्नीची दुचाकी जाळून राग शांत करणे ऐवजी इतर नागरिकांच्या देखील विनाकारण गाड्या जाळून खाक केले. या घटनेमध्ये या गाड्यांचा प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.