भूषण देसाई हातात घेणार धनुष्यबाण; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक !

750 6

मुंबई : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई आता हातात धनुष्यबाण घेणार असल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे.

भूषण देसाई यांच्या या निर्णयावर सुभाष देसाईंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.

शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.

बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide