#CORONA UPDATES : राज्याचं टेन्शन वाढलं ! कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

545 0

देशभरात इन्फ्ल्यूएंझा वाढत असताना काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेटही वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहे

राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बारा दिवसांमध्ये आढळलेल्या 712 पैकी 308 रुग्ण सापडले आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यानं दिली आहे.तर याची गंभीर दखल घेत औषधसाठा, ऑक्सिजनसाठा उपलब्ध ठेवा असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना दिले आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण तीन वर्षांपूर्वी 9 मार्चला आढळला.त्याला आता तीन वर्षे पूर्ण झाली. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदववी गेली कोरोनामुळे उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही कमी होत गेले त्यामुळे आता आपण कोरोना मुक्त झालो असा समाज करून आपले दैनंदिन व्यवहार सुरू झालेत.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार पाण्याने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे विस्मरण झाल्याचे आता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत चालली आहे

आता कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे कुठल्याही गोष्टी कडे दुर्लक्ष करू नये असे सतर्कतेचे निर्देश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide