मुंबई : आताची मोठी बातमी समोर येते आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याचं सूत्रांमार्फत समजते. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत .
दरम्यान सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई आता हातात धनुष्यबाण घेणार असल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे.
बाळासाहेब भवन येथे भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.