शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत ! ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी चित्र वाघ यांचे म्हात्रेंसाठी ट्विट

546 0

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजप आमदार, महिला नेत्यांनी शीतल म्हात्रे यांच्या पाठिशी उभं राहिल्याचं दाखवून दिलंय.

भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी आज शीतल म्हात्रे यांच्यासाठी खास ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे कि, एखादी महिला प्रगती करत असेल. तिला थांबवता येत नसेल तेव्हा अशा प्रकारच्या विकृतींद्वारे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. पण शीतल म्हात्रे यांनी हिंमतीने लढावं, आम्ही सगळ्या तुझ्या पाठिशी आहोत, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.

हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील @MumbaiPolice ना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा

शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फिंग प्रकरणी नेमकं कोण आहे, हे शोधून काढण्यासाठी एसआयटी चौकशी नेमा, अशी मागणी आज विधानसभेतही करण्यात आली.उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक झाली आहे. पण यांचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपास्थीत केला आहे.

Share This News
error: Content is protected !!