भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात हे प्रकरण देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संजय राऊत यांनी या पत्राद्वारे केली आहे.
मा. देवेंद्र जी
भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे.
@Dev_Fadnavis@dir_ed@PMOIndia@AUThackeray@AjitPawarSpeaks@AmitShahOffice pic.twitter.com/1eJg969EBu— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
जय महाराष्ट्र
आपल्या नेतृत्वाखाली सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार म्हणून काढण्याचा ठरवलं आहे आणि त्याबद्दल आपले अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोठात वावरत असतात ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची कारणे समोर आणत आहेत आणि या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपासयंत्रणांचा ससे मिराही लावला जातो भ्रष्टाचारास धर्म आणि राजकीय पक्षांना असतो त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट होणं गरजेचं आहे या मताचा मी आहे
पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड ने गेल्या काही वर्षात केलेल्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराचा प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग आहे कोल्हापुरातील आमदार हसनमुश्री यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि तपासायंत्रणांच्या धाडी यासंदर्भात पडत आहेत पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे आणि या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर असे आहे
भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार श्री किरिट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसले आहेत जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे हे सर्व प्रकरण तात्काळ इडी आणि सीबीआयच्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी या प्रकरणाचा सविस्तर तपशील सोबत जोडत आहे असे या पत्रामध्ये संजय राऊत यांनी नमूद करून या प्रकरणाचे कागदपत्र देखील जोडले आहेत.