पुण्यात ‘या’ तारखेला होणार महाविकास आघाडीची विराट सभा

391 0

शिवसेनेचं मुळ पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता तर थेट उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.

पुण्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 14 मे ला महाविकास आघाडीची पुण्यात सभा होणार आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते सभेत उपस्थित राहणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!