#NITESH RANE : “…तर दीपक केसरकर यांना निवडून आणणे आमची जबाबदारी असेल !”

810 0

कणकवली : राज्यात भाजप शिवसेनेची युती असल्याने भविष्यात २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एक मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेला तर विद्यमान आमदार व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवडून आणावेच लागेल असे वक्तव्य आज नितेश राणे यांनी कणकवली येथे एका पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, “दीपक केसरकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तसेच ते भाजप शिवसेना युतीच्या राज्य मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक भाजप शिवसेना युती म्हणून लढविली जात असताना जर एक जागा शिवसेनेकडे गेली तर दीपक केसरकर यांना निवडून आणणे युती म्हणून आमची जबाबदारी असेल.”

तसेच खासदारही भाजप सेना युतीचाच असेल मात्र ही कोणाकडे जाते याबाबतची बोलणी वरीष्ठ स्तरावर सुरू आहे. आपण यावर भाष्य करणार नाही. मात्र, ठाकरे सेनेचा खासदार यापुढे नसेल, असेही नितेश राणे यांनी म्हंटले आहे

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide