“माफी कितीदा मागायची ? आता यापुढे मी कोणाचं ऐकून घेणार नाही…!” गौतमी पाटील संतापली

959 0

पिंपरी चिंचवड : गौतमी पाटीलने आपल्या नृत्यकौशल्यातून अनेक तरुणांची मनं घायाळ केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिने तिच्या नृत्यातून अश्लील हावभाव केल्यानंतर तिच्यावर प्रचंड टीकेची जोड उठली होती. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होऊन अनेकांनी तिच्या त्या हावभावांवर आक्षेप नोंदवला होता.

दरम्यान यानंतर गौतमी पाटील हिने पत्रकार परिषद घेऊन पुन्हा असं करणार नाही आणि घडल्या प्रकाराची माफी देखील मागितली होती. पण तरी देखील तिच्यावर टीका होणं थांबलं नाही. तर काही दिवसांपूर्वी पुन्हा तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर तिच्याच जवळच्या लोकांनी व्हायरल केला. यानंतर 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी आली असताना गौतमी पाटील हिने आपली एक तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ती म्हणाली की, ” झालेल्या गोष्टींवर अनेकदा माफी मागितली. एकदा, दोनदा नव्हे तीनदा माफी मागितली… समोरच्या व्यक्तीला आता समजलं पाहिजे, हिने माफी मागितली आहे. माफी तरी कितीदा मागायची. आता यापुढे मी कोणाच ऐकून घेणार नाही. असं गौतमी पाटील म्हणाली… मला अजून बरेच जण म्हणतात. हीचं अश्लील नृत्य असतं, महिलांसमोर मी डान्स केला. हा डान्स अश्लील होता का ? हे तुम्हीच सांगा. मी तर सांगून सांगून थकले आहे. असे यावेळी ती एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटली आहे.

Share This News
error: Content is protected !!