सावधान : कोरोनानंतर आता H3N2 ने घेतला दोघांचा बळी; केंद्र सरकार अलर्ट मोडवर

468 0

भारत : दोन वर्ष कोरोना ने जगभरात थैमान घातल्यानंतर आता H3N2 या विषाणून आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली. त्यामुळे सावध होण्याची आवश्यकता आहे. H3N2 या विषानुने हरियाणा आणि कर्नाटकमध्ये दोन रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नुसार, गेल्या दोन ते तीन महिन्यात H3N2 प्रकाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या विषाणूमुळे तीव्र श्वसनाचा संसर्ग होतो आहे. हाच संसर्ग जगभरात पसरला आहे. आतापर्यंत एकूण 3,038 प्रकरणांची नोंद झाली असून जानेवारीमध्ये  1245 तर फेब्रुवारीमध्ये 1307 आणि मार्चमध्ये आत्तापर्यंत 486 प्रकरण उघडकीस आली आहेत. आत्तापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलं, वृद्ध ज्यांना इतर आजार देखील आहेत. अशांना हा आजार होण्याचा अधिक धोका असतो कर्नाटकातील हे 82 वर्षीय हिरागौडा यांचा मृत्यू झाला आहे तर हरियाणातील हिरा गौडा 56 वर्षीय रुग्ण यांना फुफ्फुसाचा कर्करोग होता. त्यांचा H3N2 ने देखील बळी घेतलाय

लक्षणे

ताप

खोकला

वाहते नाक

अंगदुखी

मळमळ

उलट्या जुलाब

काय खबरदारी घ्याल

मास्कचा वापर करा

वारंवार हात धूत रहा

सामाजिक अंतर राखा

गंभीर स्वरूपातील आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू आणि कोविड-19 साठी लसींसंदर्भातील तज्ञ समिती आज बैठक घेणार असून कोविड आणि एचडी परिस्थितीचा आढावा घेणार आहे

Share This News
error: Content is protected !!