कांदा दरावरुन रान पेटले; राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा रस्त्यावर फेकून रास्ता रोको

725 0

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर अक्षरशः कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी, या सरकारच करायचं काय? खाली डोकं वरती पाय’, केंद्र सरकार हाय हाय, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी चांदवड परिसर दणाणून गेला.

नाफेडच्या माध्यमातून खरेदी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा दरावरून नाशिकसह राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विधानभवनात देखील कांदा प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

विरोधी पक्षांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान अडीच हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

यावेळी अक्षरश कांदा रस्त्यावर फेकून देण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान 2500 रुपये हमीभाव जाहीर करावा. कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ तसंच घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!