फिल्मी स्टाईल पळापळी : रस्त्यावर झाली वाहतूक कोंडी; नवरदेवाने काढला पळ

693 0

बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे, की ज्या घटनेवर हसावं की दुःख व्यक्त करावं असाच प्रश्न पडेल. तर झाला अस की 15 फेब्रुवारी एका जोडप्याचं लग्न झालं. बंगळुरूमधून एका गर्दीच्या ठिकाणावरून जात असताना रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फायदा घेऊन नवरदेवाने कारमधून अक्षरशः पळ काढला. नवविवाहितेने देखील तिच्या नवऱ्याचा बराच पाठलाग केला. पण तो काही तिच्या हाती शेवटपर्यंत लागला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हि व्यक्ती गोव्यामध्ये त्याच्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करतो. दरम्यान या व्यक्तीचे एका दुसऱ्या मुलीशी अफेअर होते. या गोष्टीची कल्पना या विवाहितेला देण्यात आली होती. पण लग्न करतेवेळी त्या मुलीशी मुलाचा आता काहीही संबंध नाही असं या नवविवाहितेला सांगण्यात आलं होतं.

नवरा पळून गेल्यानंतर या नवविवाहितेने तब्बल 15 दिवस तो परत येईल अशी वाट पाहिली. पण तो परत येणार नाही असे चिन्ह दिसल्यानंतर शेवटी तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये तिने म्हटले आहे की, नवऱ्या मुलाचे एका मुलीशी प्रेम संबंध होते. लग्न करते वेळी त्या मुलीमध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये कोणताही संबंध राहिला नाही, असं सांगण्यात आलं होतं. परंतु या मुलीने तिच्याकडील आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि म्हणूनच तिचा नवरा पळून गेल्या असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे.

Share This News
error: Content is protected !!