#UPDATE : रिल्स बनवताना सावध राहा ! पुण्यात महिलेचा गेला हाकनाक बळी; रील बनवताना झाला अपघात

702 0

पुणे : पुण्यात काल इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याच्या नादात एका महिलेचा अपघात झाला. या अपघातामध्ये या महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वानवडी पोलिसांनी आयान शेख आणि जाहिद शेख या दोघा रिल्स बनवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतला आहे. रिल्स बनवताना झालेल्या अपघातात तसलीम फिरोज पठाण या महिलेचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी आयान आणि जाईन हे दोघं सहा मार्चला कृष्णा नगर परिसरात दुचाकीवर बसून रील बनवत होते. यावेळी आयान हा गाडी चालवत होता. गाडी वेगाने चालवत असताना त्याच्या मागे बसून झाईद हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. या परिसरातून जाणाऱ्या तसलीम पठाण यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर या दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला होता. वानवडी पोलिसांनी या दोघांचा तपास करून त्यांना अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!