SANJAY RAUT

#MAHARASHTRA POLITICS : संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग कारवाई होणार ? उद्या महत्त्वाची बैठक

376 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नऊ तारखेला उद्या याबाबत हक्कभंग समितीची चार वाजता बैठक होणार आहे.

विधिमंडळात संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर एक मार्चला हक्कभंगचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संजय राऊत यांना हक्कभंगची नोटीस पाठवून 48 तासात लेखी म्हणणे मांडणे संदर्भात सांगितलं होतं. परंतु अद्याप देखील संजय राऊत यांनी या नोटीसला कोणतही उत्तर दिलेलं नाही.

दरम्यान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडला असून, उद्या याबाबत हक्कभंग समितीची चार वाजता बैठक होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे.

Share This News
error: Content is protected !!