महत्वाची बातमी : गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेला सुरुवात

558 0

पुणे : पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीया गुरुवार पासून सुरु करण्यात येणार आहे.

मध्यतंरी पोटनिवडणूक प्रक्रियेमुळे या भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र पुन्हा ही प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असून ज्या महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी महा आयटी वेबसाईटवरून प्रवेशपत्र प्राप्त करावे. प्रवेशपत्रावरील तारखेनुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करीता पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे उपस्थित रहावे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!