#PUNE : PMPMLची सेवा पूर्ववत करावी : जगदिश मुळीक

586 0

पुणे : पीएमपीएमएलच्या बस ठेकेदारांनी अचानकपणे पुकारलेल्या संपासंदर्भात पीएमपीएल चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.

या वेळी बोलताना शहराध्यक्ष जगदिश मुळीक म्हणाले सध्या १० वी आणि १२वी च्या परीक्षा चालू आहेत. अशावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बस चा वापर करतात अशा परिस्थिती मध्ये जर संप पुकारला गेला तर ते विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्या सारखे होईल पुणेकर नागरिकांचे हाल भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही.

त्यामुळे बससेवा पूर्ववत करण्यात यावी तसेच बेकायदेशीर संप पुकारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी यावेळी बकोरियांकडे केली. शिवाय पुन्हा असा प्रकार होऊन पुणेकरांची ससेहोलपट होऊ नये, असेही यावेळी ओमप्रकाश बकोरियांना सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्यासह सरचिटणीस गणेश घोष, संदिप लोणकर, सुशिल मेंगडे, धनंजय जाधव, विकास लवटे, संतोष राजगुरु, हरीश निकम,शैलेश राजगुरु, विक्रम निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

Share This News
error: Content is protected !!