अजब लग्नाची गजब गोष्ट : मंदिरात पार पडला मुस्लिम जोडप्याचा निकाह; कारण नक्की वाचा

890 0

शिमला : आतापर्यंत तुम्ही दोन वेगवेगळ्या धर्माच्या जातीच्या युवकांनी लग्न गाठ बांधल्याच ऐकला असेल. डेस्टिनेशन वेडिंग मध्येही अनेक चित्र विचित्र प्रकार घडले आहेत. पण नुकताच एका अजब लग्नाची गोष्ट कानावर येते आहे. तर झालं असं की, शिमला येथे रामपूरमध्ये एक लग्न सोहळा पार पडला. हा लग्न सोहळा संपूर्णपणे इस्लामी विधीनुसार पार पडला. परंतु या लग्नाचं डेस्टिनेशन होतं मंदिर…!

हो तुम्ही बरोबर वाचता आहात. तर झालं असं की, विश्व हिंदू परिषद संचलित ठाकूर सत्यनारायण मंदिर परिसरात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला असून याच मंदिराच्या आवारात मौलवी, साक्षीदार आणि वकील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता तुम्हाला नक्की हा लग्न सोहळा मंदिरात का पार पडला असा प्रश्न पडला असेल.

तर त्यामागे कारण असं आहे की ठाकूर सत्यनारायण मंदिर ट्रस्ट रामपूरचे सरचिटणीस विनय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसवर अनेकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला जातो. आमच्या उपस्थितीत येथे एका मुस्लिम जोडप्यानं लग्न केलं. सनातन धर्म सदैव सर्वांना समाविष्ट करून पुढे जाण्याची प्रेरणा देतो. याचंच हे उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर लोकांमध्ये धार्मिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणे हा मंदिर परिसरात हा विवाह लावण्याचा उद्देश असल्याचा देखील त्यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!