धक्कादायक : विवाहित प्रेयसी सोबत तिच्याच सासरी जाऊन करायचा असले उपद्व्याप; अडवणूक करणाऱ्या सासूवरच केला प्रेयसी समोर अत्याचार

1230 0

नागपूर : आजकाल रक्ताची नाती सुद्धा नातं सांभाळण्यामध्ये रस घेत नाही. अशातच नागपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या लग्नानंतर देखील तिचा प्रियकर थेट तिच्या सासरी जाऊन तिच्याशी लैंगिक चाळे करायचा. सासू मूकबधिर होती, पण जेव्हा आपल्या मुलाचा संसार तुटू नये म्हणून तिने विरोध करायला सुरुवात केली, तसा या नराधम प्रियकरानं थेट तिच्या सासूवरच बलात्कार केला. हा संपूर्ण प्रकार या प्रेयसीसमोरच घडला.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी या सुनेच्या प्रियकराला अटक केली. या प्रकरणी विनू वय वर्ष 28 याला पोलिसांनी ताब्यात घेतल असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपीचे एका तरुणीवर प्रेम होते. पण त्याच गावातील एका नात्यातील कुटुंबामध्ये या मुलीचे तिच्या घरच्यांनी लग्न लावून दिले. त्यानंतर गावातच ही मुलगी तिच्या प्रियकरच्या डोळ्यादेखत सुखानं संसार करत होती. मात्र हे या आरोपीला पहावत नव्हतं. तो दारूच्या आहारी गेला होता. हळूहळू तिच्या प्रियकरांने पुन्हा तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून घेतले.

तिचा पती घरात नसताना तो तिच्या सासरी जायचा यासाठी तिची सासू तिला नेहमी विरोध करायची पण सासू मूकबधिर असल्याचा तिने फायदा घेतला. एवढेच नाही तर हे दोघेजण घरामध्ये सासूसमोरच अश्लील चाळे देखील करायचे. सासूचा वाढता विरोध पाहता संतापलेल्या प्रियकरांन थेट सासूवरच बलात्कार केला. हा बलात्कार त्याने त्या सुनेच्या डोळ्यादेखत केला. मुलगा घरी आल्यानंतर सासूने कसेबसे खाणा-खुणा करून घडला प्रकार मुलाला सांगितल्यानंतर याप्रकरणी मुलाने पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide