#PUNE ACCIDENT : कात्रज बोगद्याजवळ विचित्र अपघात; वाहनांची अक्षरशः उलथापालत !

791 0

पुणे : कात्रज बोगद्याजवळ आज सकाळी विचित्र अपघाताची घटना घडली आहे. दरी पूल पेट्रोल पंपाजवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्ससह दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर सकाळच्या सुमारास हि घटना घडली असून दरी पूल पेट्रोल पंपाजवळ मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली. या धडकेमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्ससह दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे. या वाहनांची अक्षरशः उलथापालथ झाली आहे. या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले आहेत. सुदैवाने सीट बेल्ट लावला असल्याने प्रवासी वाचले असल्याचे समजते.

दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!