समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूचं !

632 0

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर काल मध्यरात्री ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक केमिकलने भरलेला होता. त्यामुळे ट्रक खाली कोसळताचं ट्रकने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की ट्रक मधील एकाही प्रवाशाला आपला जीव वाचवण्याचा साधा प्रयत्नही करता आला नाही या ट्रक मधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फातियाबाद परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मध्यरात्री केमिकलने भरलेला हा ट्रक समृद्धी महामार्गावरून जात होता. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचं प्राथमिक अंदाजानुसार म्हटलं जातंय. अपघातानंतर ट्रक पुलावरून खाली कोसळला.

या ट्रकमधून वेगवेगळ्या केमिकलची वाहतूक केली जात होती. दरम्यान या पुलावरून ट्रक खाली कोसळल्यानंतर ट्रक मधील केमिकल्सने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की, ट्रक खाली कोसळताक्षणी ट्रकने प्रचंड पेट घेतला. यातून एकाही प्रवाशाला आपले प्राण वाचवता आले नाहीत. नक्की या ट्रकमध्ये किती प्रवासी होते ? हे समजू शकले नाही. परंतु चालकासह ट्रक मधील सर्व प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने आग विझवली आहे. मात्र ट्रक मधील प्रवाशांना वाचवण्यात अपयश आले आहे.

Share This News
error: Content is protected !!