#VIRAL VIDEO : काल लाच घेताना रंगेहात पकडलं; आज घरात नोटांचं घबाड सापडलं ! भाजप आमदार सुपुत्र अटक

928 0

कर्नाटक : कर्नाटकचे भाजपचे आमदार वीरूपक्षप्पा यांचे सुपुत्र प्रशांत यांना अटक करण्यात आली आहे. या आमदार पुत्राला कालच लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. तर या मुलाच्या घरी आज अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता घरातून तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भाजप आमदार यांचा मुलगा प्रशांत याला काल लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाड टाकली असता नोटांचे घबाड आढळून आलं. धक्कादायक म्हणजे हि लाच स्वीकारण्याचं काम हे थेट आमदाराच्या कार्यालयात सुरू होतं, तर हि लाच या भाजपा आमदारासाठीच स्वीकारली जात असल्याच देखील म्हटले जात आहे.

लोकायुक्तांच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेनं काल 40 लाख रुपयांची लाच घेताना प्रशांत याला अटक केली. त्यानंतर घरी धाड टाकली असता सहा कोटी रुपयांची रोकड सापडून आली. नोटांच्या ढिगार्‍याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

कर्नाटकात वर्षभरामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार पुत्राच्या घरी एवढी रक्कम सापडल्याने भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!