मोठी बातमी : बारावीचा गणिताचा पेपर फुटला; व्हॅट्सऍपवर प्रश्नपत्रिका व्हायरल ? गंभीर प्रकरण

609 0

बुलढाणा : सध्या राज्यात बारावीचे बोर्डाचे पेपर सुरू आहेत. कडेकोट बंदोबस्त असताना देखील बारावीचा गणिताचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिंदखेडराजा या ठिकाणी परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर फुटला आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर हा पेपर व्हाट्सअपवर व्हायरल करण्यात आला, तर परीक्षा केंद्रांवर मोबाईलला बंदी असताना देखील पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला कसा याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

कॉपीमुक्त परीक्षांच अभियान राबवलं… भरारी पथकांच नियोजन केलं… पण तरीही राज्यभरामध्ये कॉफीचे प्रकार सर्रास सुरूच आहेत. एवढा कडेकोट बंदोबस्त असून देखील यवतमाळमध्ये विद्यालयात बारावीचा फिजिक्सचा पेपर सुरू असताना वर्गाच्या खिडकीतून कॉपी पुरवण्याचे प्रकार घडले आहेत. थोडे थोडके नाही तर अक्षरशः हे कॉपी पुरवण्यासाठी कॉपी-बहाद्दरांची झुंबड दिसून येते आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील शिक्षक नेमकं काय करत आहेत हा देखील प्रश्न आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!