मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील एक महिला विदेश एयर होस्टेस जखमी झाली असल्याचे समजते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलाजवळ रात्री टेम्पो आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील एक महिला जखमी झाली आहे. सुदैवाने बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत.
या अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आणि या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा टेम्पो मासळी वाहतूक करणार आहे. तर बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाइन्स चे कर्मचारी होते. जे सर्व ताज लाइन्ड हॉटेल कडे जात होते. हे सर्व कर्मचारी विदेशी असून अपघात झाल्यानंतर या बसचा चालक फरार झाला आहे.